सुभाषित

न हि तद्विद्यते किञ्चित्

अर्थाने अशक्य काही नाही.

न हि तद्विद्यते किञ्चिद्यदर्थेन न सिद्ध्यति ।
यत्नेन मतिमांस्तस्मादर्थमेकं प्रसाधयेत् ॥

पैशाने साध्य होत नाही असे या जगात काहीच नाही, असे म्हटले आहे. म्हणून बुद्धिमानाने प्रयत्नाने अर्थ साधावा. धनार्जनाचे महत्त्व सांगणारे, पण उद्योगाशी जोडलेले वचन आहे.

- पंचतंत्र