सुभाषित

पुस्तकस्था तु या विद्या

पुस्तकातली विद्या उपयोगाची नव्हे.

पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतं च धनम् ।
कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम् ॥

फक्त पुस्तकात राहिलेली विद्या आणि दुसऱ्याच्या हाती गेलेले धन — गरजेच्या वेळी उपयोगी पडत नाही. विद्या मनात आणि हातात असावी, धन स्वतःकडे असावे.

- चाणक्य नीति / पारंपरिक