सुभाषित

शतेषु जायते शूरः

शूर, पंडित, वक्ता, दाता दुर्लभ.

शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पण्डितः ।
वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा ॥

शंभरांत एक शूर जन्मतो, हजारांत एक पंडित, दहा हजारांत एक चांगला वक्ता, आणि दाता तर क्वचितच. गुणांची दुर्लभता सांगणारे वचन आहे.

- पारंपरिक सुभाषित