उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीः
दैवं हि दैवमिति कापुरुषा वदन्ति ।
दैवं निहत्य कुरु पौरुषमात्मशक्त्या
यत्ने कृते यदि न सिध्यति कोऽत्र दोषः ॥
लक्ष्मी उद्यमी सिंहपुरुषांकडे येते. कायर लोक फक्त दैवाची भाषा करतात. दैवावर अवलंबून न राहता स्वबळाने पुरुषार्थ करावा. प्रयत्न करूनही न झाले तर दोष कोणाचा, असा प्रश्न आहे — प्रयत्नच श्रेष्ठ.
- पञ्चतन्त्र / पारंपरिक