भारूड

अभयपत्र जिवाजीपंतास । कळावे कीं मौजे देहपूरची वागणूक उत्तम स्वधर्मयुक्त चालवूं

एकनाथांचे अभयपत्र भारूड.

अभयपत्र जिवाजीपंतास । कळावे कीं मौजे देहपूरची वागणूक उत्तम स्वधर्मयुक्त चालवूं ।
ऐशी तुम्ही लिहून कळविली । तेणेंकरून धन्यास फार संतोष जाहला ।
जाणोन धन्यानें तुमचे गांवचे आबादी करितां । ज्ञानवैराग्यासह शांति क्षमा दया हे ताबडतोब रवाना केलें ।
मौजे मजकुरी पावतांच यांचा अंगिकार करून वहिवाट सुरू करणें । या कामीं कोणाची हरकत धरूं नये ।
मागाहून स्वधर्मपंताची स्वारी येणार आहे । तुम्ही आपुले हुशारींत राहणें । लिहिलेप्रमाणें वर्तणूक ठेवणें ।
एका जनार्दनीं शरण । हें अभयपत्र दिलें । सही ॥ १ ॥

एकनाथ या भारूडात अभयपत्र या रूपाने सांगतात. अभयपत्र जिवाजीपंतास , कळावे कीं मौजे देहपूरची वागणूक उत्तम स्वधर्मयुक्त चालवूं , ऐशी तुम्ही लिहून कळविली , तेणेंकरून धन्यास फार संतोष जाहला , जाणोन धन्यानें तुमचे गांवचे आबादी करितां , ज्ञानवैराग्यासह शांति क्षमा दया हे ताबडतोब रवाना केलें , मौजे मजकुरी पावतांच यांचा अंगिकार करून वहिवाट सुरू करणें , या कामीं कोणाची हरकत धरूं नये , मागाहून स्वधर्मपंताची स्वारी येणार आहे , तुम्ही आपुले हुशारींत राहणें , लिहिलेप्रमाण.

- संत एकनाथ