आडबंग आडबंग । सदा विषयामध्यें दंग । मदमस्त डोले भुजंग । प्रेमकीर्तनाचा रंग । मोडून झाला निःसंग ॥ १ ॥
बैसे वेश्याघरीं जाऊन । तिशीं करी हास्यवदन । स्वकरें विड्या देऊन । वेश्या करी त्याचें छळण गा ॥ २ ॥
ज्ञान नाहीं मूढ तो जन । स्वस्त्री टाकून । उकिरडा ओतीरे रतिरेतजन । आपुली स्त्री नेली मांगनं गा ॥ ३ ॥
त्याचें न पाहावें काळें वदन । पशु गाढवासमान । नरतनु व्यर्थ बुडवून । नाहीं साधिलें साधन गा ॥ ४ ॥
मागें केलें देई टाकुन । करी हरींचें चिंतन । येणें साधिलें बहु साधन । केला जामीन जनार्दन ॥ ५ ॥
एकनाथ या भारूडात आडबंग या रूपाने सांगतात. आडबंग आडबंग , सदा विषयामध्यें दंग , मदमस्त डोले भुजंग , प्रेमकीर्तनाचा रंग , मोडून झाला निःसंग. पुढे बैसे वेश्याघरीं जाऊन , तिशीं करी हास्यवदन , स्वकरें विड्या देऊन , वेश्या करी त्याचें छळण गा. शेवटी मागें केलें देई टाकुन , करी हरींचें चिंतन , येणें साधिलें बहु साधन , केला जामीन जनार्दन.
- संत एकनाथ