भारूड

अलक्ष लक्ष मी भिकारी

एकनाथांचे भिकारी भारूड.

अलक्ष लक्ष मी भिकारी ।
म्हणोनी आलो सद्गुरुद्वारी ।
भिक्षा मागतो नाना परी ।
कोण्ही वाचे स्मरा मुरारी ॥१॥
बाबा बाळसंतोष ॥धृ. ॥
चार युगे करुनी फेरी ।
हिंडो सद्गुरुचे द्वारी ॥२॥
भिक्षा मागो अलक्षपुरी ।
तेणे तुटेचौर्याऎंशी फेरी ॥३॥
शरण एका जनार्दन ।
तुटले देहाचे बंधन ।
कर्माकर्माचे खंडन ।
गेले विलया जीवपणा ॥४॥

एकनाथ या भारूडात भिकारी या रूपाने सांगतात. अलक्ष लक्ष मी भिकारी , म्हणोनी आलो सद्गुरुद्वारी , भिक्षा मागतो नाना परी , कोण्ही वाचे स्मरा मुरारी. पुढे बाबा बाळसंतोष चार युगे करुनी फेरी , हिंडो सद्गुरुचे द्वारी. शेवटी शरण एका जनार्दन , तुटले देहाचे बंधन , कर्माकर्माचे खंडन , गेले विलया जीवपणा.

- संत एकनाथ