भारूड

अलक्ष लक्ष पाहवेना

एकनाथांचे अलक्ष भारूड.

अलक्ष लक्ष पाहवेना ।
ते कोणाचे ध्यानी बैसेना ।
योगी ध्याती जया मना ।
ते आणी पां रे आपुल्यामना ॥१॥
बाबा बाळसंतोष ।बाळसंतोष ॥धृ. ॥
अनुहात शब्द निराळा ।
सोहं सोहं त्याची कळा ।
ते न ये ध्यान मना सकळा ।
ऎशी अगम्य त्याची कळा ॥२॥
जुनी टाका देहाची अंगी ।
भाव धरा भक्ती संगी ।
विरेल देहपण अंगाचे अंगी ।
मिथ्या प्रपंच जाईल भंगी ॥३॥
एका जनार्दनी मागे दान ।
पूर्ण परिपूर्ण कळली खूण ।
सबाह्य कोंदला जनार्दन ।
देहींच विदेही जाहला पूर्ण ॥४॥

एकनाथ या भारूडात अलक्ष या रूपाने सांगतात. अलक्ष लक्ष पाहवेना , ते कोणाचे ध्यानी बैसेना , योगी ध्याती जया मना , ते आणी पां रे आपुल्यामना. पुढे बाबा बाळसंतोष , बाळसंतोष अनुहात शब्द निराळा , सोहं सोहं त्याची कळा , ते न ये ध्यान मना सकळा , ऎशी अगम्य त्याची कळा. शेवटी एका जनार्दनी मागे दान , पूर्ण परिपूर्ण कळली खूण , सबाह्य कोंदला जनार्दन , देहींच विदेही जाहला पूर्ण.

- संत एकनाथ