सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥ १ ॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥ २ ॥
सासू माझी जाच करिते । लौकर निर्दाळी तिला ॥ ३ ॥
जाऊ माझी फडफड बोलति । बोडकी कर गं तिला ॥ ४ ॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे तिला ॥ ५ ॥
दादला मारून आहुति देईन । मोकळी कर गं मला ॥ ६ ॥
एका जनार्दनि सगळेच जाऊ दे । एकलीच राहू दे मला ॥ ७ ॥
एकनाथ या भारूडात अंबा या रूपाने सांगतात. सत्वर पाव गे मला , भवानी आई रोडगा वाहिन तुला. पुढे सासरा माझा गावी गेला , तिकडेच खपवी त्याला. शेवटी एका जनार्दनि सगळेच जाऊ दे , एकलीच राहू दे मला.
- संत एकनाथ