आम्ही परात्पर देशी ।
कोणी नोळखती आम्हासी ।
टाकून आलो संतापाशी ॥१॥
बाळसंतोष बाबा ॥धृ. ॥
जीर्ण स्वरूपाचा शेला ।
विषय भोगीता विटला ।
तो मज द्याव दाते वहिला ॥२॥
ऎकत्वाचे बिरडे जोडी ।
त्रिगुणासी कसणी फेडी ।
जुनी कांसणी रोकडी ॥३॥
पूर्णत्वाची पुरणपोळी ।
स्नेहावरील तेलवरी ।
प्रबोध लाडू तयावरी ॥४॥
एका जनार्दनी मागतादान ।
जिताची जाण जीवपण ।
शेखी दिले शिवपण ॥५॥
एकनाथ या भारूडात आम्ही परात्पर देशी या रूपाने सांगतात. आम्ही परात्पर देशी , कोणी नोळखती आम्हासी , टाकून आलो संतापाशी. पुढे बाळसंतोष बाबा जीर्ण स्वरूपाचा शेला , विषय भोगीता विटला , तो मज द्याव दाते वहिला. शेवटी एका जनार्दनी मागतादान , जिताची जाण जीवपण , शेखी दिले शिवपण.
- संत एकनाथ