भारूड

अयोध्येचा हो देव्हारा । आला अहंकाराचा वारा

एकनाथांचे देव्हारा भारूड.

अयोध्येचा हो देव्हारा । आला अहंकाराचा वारा ।
डोळे फिरवी गरगरा ॥ १ ॥
मानवी रामाबाई मानवी कृष्णाबाई ॥ धृ. ॥
रामाबाईचा घरचारू । चौघाजणांचा व्यापारू ।
सहा अठराचा पडिभारू ॥ २ ॥
रामाबाईचा वो शेला । ब्रह्म शेटिने विणिला ।
तुजलागी पांघुरविला ॥ ३ ॥
येथोनि जालासे सोहळा । रामाबाईला वोवाळा ।
एका जनार्दनी मुळा ॥ ४ ॥

एकनाथ या भारूडात देव्हारा या रूपाने सांगतात. अयोध्येचा हो देव्हारा , आला अहंकाराचा वारा , डोळे फिरवी गरगरा. पुढे मानवी रामाबाई मानवी कृष्णाबाई रामाबाईचा घरचारू , चौघाजणांचा व्यापारू , सहा अठराचा पडिभारू. शेवटी येथोनि जालासे सोहळा , रामाबाईला वोवाळा , एका जनार्दनी मुळा.

- संत एकनाथ