भारूड

बहिरा जालो या या जगी

एकनाथांचे बहिरा भारूड.

बहिरा जालो या या जगी ॥धृ. ॥
नाही ऎकिले हरिकीर्तन ।
नाही केले पुराण श्रवण ।
नाही वेदशास्त्रण पठण ।
गर्भी बहिरा झालो त्यागुन ॥१॥
नाही सन्तकीर्ति श्रवणी आली ।
नाही साधूसेवा घडियेली ।
पितृवचनासी पाठ दिधली ।
तीर्थे व्रते असोनी त्यागिली ॥२॥
माता माऊली पाचारिता ।
शब्द नाही दिला मागुता ।
बहिरा जालो नरदेही येता ।
एका जनार्दनी स्मरे न आता ॥३॥

एकनाथ या भारूडात बहिरा या रूपाने सांगतात. बहिरा जालो या या जगी नाही ऎकिले हरिकीर्तन , नाही केले पुराण श्रवण , नाही वेदशास्त्रण पठण , गर्भी बहिरा झालो त्यागुन. पुढे नाही सन्तकीर्ति श्रवणी आली , नाही साधूसेवा घडियेली , पितृवचनासी पाठ दिधली , तीर्थे व्रते असोनी त्यागिली. शेवटी माता माऊली पाचारिता , शब्द नाही दिला मागुता , बहिरा जालो नरदेही येता , एका जनार्दनी स्मरे न आता.

- संत एकनाथ