भारूड

शिळा तांब्याचे बाहुलें केलें । पाट मांडूनी वरी बसविलें । वस्त्र अलंकारीं गुंडाळिलें । मना

एकनाथांचे बाहुलें भारूड.

शिळा तांब्याचे बाहुलें केलें । पाट मांडूनी वरी बसविलें । वस्त्र अलंकारीं गुंडाळिलें । मना आलें तें नाम ठेविलें ॥ १ ॥
या जनासी लागलें वेड ॥ध्रु०॥
शुद्ध पाण्यानें प्रक्षाळीलें । गंध फुलानें झाकोळिलें । धूप दाऊनि दीपें उजळिलें । पुढें अन्न ठेवूनि चाळविलें ॥ २ ॥
घेरे घेऊनि भोवंडिलें । आडवे पडोनी दंडवत केलें । आपपर नाहीं देखिलें । एका जनार्दनीं ओळखिलें ॥ ३ ॥

एकनाथ या भारूडात बाहुलें या रूपाने सांगतात. शिळा तांब्याचे बाहुलें केलें , पाट मांडूनी वरी बसविलें , वस्त्र अलंकारीं गुंडाळिलें , मना आलें तें नाम ठेविलें. पुढे या जनासी लागलें वेड ० शुद्ध पाण्यानें प्रक्षाळीलें , गंध फुलानें झाकोळिलें , धूप दाऊनि दीपें उजळिलें , पुढें अन्न ठेवूनि चाळविलें. शेवटी घेरे घेऊनि भोवंडिलें , आडवे पडोनी दंडवत केलें , आपपर नाहीं देखिलें , एका जनार्दनीं ओळखिलें.

- संत एकनाथ