भारूड

ऐका बेटकुळीचे महिमान । सांगे सकळ लोकां जना । संतमहंताच्या खुणा । ऐका वाचून त्या

एकनाथांचे बेटकुळी भारूड.

ऐका बेटकुळीचे महिमान । सांगे सकळ लोकां जना । संतमहंताच्या खुणा । ऐका वाचून त्या ॥ १ ॥
टराव टराव टराव । मृगवट जाण गा ॥ ध्रु० ॥
इचे ग्रामीं आहे कोण । दंभ अहंकाराची खूण । शब्द करी नाना विंदान । इचे स्थानीं बैसविले जाण ॥ २ ॥
रवीमंडळापासोन । सात विकाराचा मान । एकवीस स्वर्गाचिये ध्यान । साधु सज्जन करिती गायन ॥ ३ ॥
दश अवतारीण । राखी भृगूचा सन्मान । भक्तासाठीं झाला श्वान । पाहे विटेवरी मौन्य ॥ ४ ॥
एका जनार्दनीं कुळीचें वर्म दिनीं । तळीं पाताळी वितळा जनीं वनीं । सद्गुरुपायी मिठी घालूनी । लाधेल प्रासादिक वाणी ॥ ५ ॥

एकनाथ या भारूडात बेटकुळी या रूपाने सांगतात. ऐका बेटकुळीचे महिमान , सांगे सकळ लोकां जना , संतमहंताच्या खुणा , ऐका वाचून त्या. पुढे टराव टराव टराव , मृगवट जाण गा ० इचे ग्रामीं आहे कोण , दंभ अहंकाराची खूण , शब्द करी नाना विंदान , इचे स्थानीं बैसविले जाण. शेवटी एका जनार्दनीं कुळीचें वर्म दिनीं , तळीं पाताळी वितळा जनीं वनीं , सद्गुरुपायी मिठी घालूनी , लाधेल प्रासादिक वाणी.

- संत एकनाथ