एक जटाधारी दिसत । एक डोळे वटारुनी पाहत । एक गुरकावुनी बोलत । एक गिळावयासी पाहत । ग ग ग ग । कसं करतंय । मी यैंव । मी यैंव सांवळें बाळ तान्हुलें । कसं करतय० ॥ध्रु०॥
एक पाताळमधीं राहत । त्रिभुवनीं त्याचीच मात । एक डोळ्यामधीं चमकत । त्यामधीं जग दिसत ॥ २ ॥
एकनाथ साधु भला । जनार्दनासी शरण गेला । देहीं याचा देव केला । त्यानें रूप दाविलें त्याला ॥ ३ ॥
एकनाथ या भारूडात बेटकुळी या रूपाने सांगतात. एक जटाधारी दिसत , एक डोळे वटारुनी पाहत , एक गुरकावुनी बोलत , एक गिळावयासी पाहत , ग ग ग ग , कसं करतंय , मी यैंव , मी यैंव सांवळें बाळ तान्हुलें , कसं करतय० ० एक पाताळमधीं राहत , त्रिभुवनीं त्याचीच मात , एक डोळ्यामधीं चमकत , त्यामधीं जग दिसत. एकनाथ साधु भला , जनार्दनासी शरण गेला , देहीं याचा देव केला , त्यानें रूप दाविलें त्याला.
- संत एकनाथ