भारूड

तुमचें गूज तुम्हां बोले । आमुचें त्यांत काय गेलें । वरले आळीस नवल देखिलें । एका पुरुषानें

एकनाथांचे बेटकुळी भारूड.

तुमचें गूज तुम्हां बोले । आमुचें त्यांत काय गेलें । वरले आळीस नवल देखिलें । एका पुरुषानें कुत्रें खादलें ॥ १ ॥
नवल मोठें जाणा । कान्होबा नवल मोठें जाणा । तुमच्या तुम्ही जाणा खुणा ॥ध्रु०॥
ओस गांवचा एक मारुती । त्याचा बाप चोरी करी दिवसराती । त्यासी पंचावन सांगाती । गांवच्या कुळकर्ण्याची फजिती ॥ २ ॥
गंगे आला महापूर । वाहून गेलें तेथें अंबर । चंद्रसूर्य दारोदार । हिंडो लागलीं पांच पोरें ॥ ३ ॥
त्याला साक्षी एक जांवई । सासूबाई देती ग्वाही । लेक आमुची ढालगज पाहीं । एका शरण जनार्दन पायीं ॥ ४ ॥

एकनाथ या भारूडात बेटकुळी या रूपाने सांगतात. तुमचें गूज तुम्हां बोले , आमुचें त्यांत काय गेलें , वरले आळीस नवल देखिलें , एका पुरुषानें कुत्रें खादलें. पुढे नवल मोठें जाणा , कान्होबा नवल मोठें जाणा , तुमच्या तुम्ही जाणा खुणा ० ओस गांवचा एक मारुती , त्याचा बाप चोरी करी दिवसराती , त्यासी पंचावन सांगाती , गांवच्या कुळकर्ण्याची फजिती. शेवटी त्याला साक्षी एक जांवई , सासूबाई देती ग्वाही , लेक आमुची ढालगज पाहीं , एका शरण जनार्दन पायीं.

- संत एकनाथ