रात्रीमाजीं स्वप्न देखिलें । परपुरुषाचें घर पळालें । तेथें नागवें आडवें आलें । तेणें उघड्यासी गिळिलें ॥ १ ॥
नवल माझें तुम्हीं पहा । उगवें नुगवतां उगेच रहा ॥ध्रु०॥
माझ्या नवलाची परी । खालीं कुंभार वरते चाक फेरी । लक्ष लागें तोचि येईना हरी । ऐशी नवलाची कोण परी ॥ २ ॥
नवल पाहून बहु भ्यालें । या जगामधीं नाहीं आले । ते स्वदेहासी मुकले । ऐशापरी नरनारी ठकले ॥ ३ ॥
या नवलासी गिळून । एक राहिला जनार्दन । एका जनार्दनीं शरण । तो नवली नाहीं भिन्न ॥ ४ ॥
एकनाथ या भारूडात बेटकुळी या रूपाने सांगतात. रात्रीमाजीं स्वप्न देखिलें , परपुरुषाचें घर पळालें , तेथें नागवें आडवें आलें , तेणें उघड्यासी गिळिलें. पुढे नवल माझें तुम्हीं पहा , उगवें नुगवतां उगेच रहा ० माझ्या नवलाची परी , खालीं कुंभार वरते चाक फेरी , लक्ष लागें तोचि येईना हरी , ऐशी नवलाची कोण परी. शेवटी या नवलासी गिळून , एक राहिला जनार्दन , एका जनार्दनीं शरण , तो नवली नाहीं भिन्न.
- संत एकनाथ