भारूड

नका धरूं धरूं अनुमान । आले मुसळासी कान । जातियाची पाळी करी रुदन । वेधियलें मन चाटुवाचे

एकनाथांचे बेटकुळी भारूड.

नका धरूं धरूं अनुमान । आले मुसळासी कान । जातियाची पाळी करी रुदन । वेधियलें मन चाटुवाचे ॥ १ ॥
अर्थ करा माझे भाई । नका हिंडूं दिशा दाही ॥ध्रु०॥
उठिला रागावूनि पाटा । येउनी बैसला दारवंटा । मोडिला काथवटीचा थाटा । वरवंटा नाचतसे ॥ २ ॥
चूल धांवूनी आली बाहेरी । रागावली घारीवरी । शिंकेकरी मारामारी । घरकुलासी भेडसावी ॥ ३ ॥
घर जाहलें जुनाट वाउगें । पाया निघाला लागवेगेम । भिंत उडाली सवेगें । कोणी कोणा आवरीना ॥ ४ ॥
एका जनार्दनीं म्हणे । न कळे वेदांतीया बोलणें । मतवादीयांचें ठाणें । सहज गेलें उठोनी ॥ ५ ॥

एकनाथ या भारूडात बेटकुळी या रूपाने सांगतात. नका धरूं धरूं अनुमान , आले मुसळासी कान , जातियाची पाळी करी रुदन , वेधियलें मन चाटुवाचे. पुढे अर्थ करा माझे भाई , नका हिंडूं दिशा दाही ० उठिला रागावूनि पाटा , येउनी बैसला दारवंटा , मोडिला काथवटीचा थाटा , वरवंटा नाचतसे. शेवटी एका जनार्दनीं म्हणे , न कळे वेदांतीया बोलणें , मतवादीयांचें ठाणें , सहज गेलें उठोनी.

- संत एकनाथ