भारूड

दादा वरले माळीं दिसतें । दोनी डोळे वटारितें । तें बा भेडसावितें । जवळीं गेल्या गिळूं पहाते

एकनाथांचे भूत भारूड.

दादा वरले माळीं दिसतें । दोनी डोळे वटारितें । तें बा भेडसावितें । जवळीं गेल्या गिळूं पहातें ॥ १ ॥
तें बा दुःखदायक । तेणें शिणविले सिद्ध साधक । तें बा विशाळ भयानक । वेगीं गोंवी तिन्ही लोक ॥ २ ॥
तेणें मुंगीचा मार्ग घेतिला । मुळीहूनि शेंडा चढला । शेंड्यापासुनी खालत आला । तो तेथोनी निसटोनी गेला ॥ ३ ॥
तें बा अचोज चोजवेना । जवळी आहे परी दिसेना । तें बा झोंबिन्नले कळेना । झाडितां परी झडेना ॥ ४ ॥
तनमनुधनें शरण । एकनिष्ठ जयाचें मन । एका जनार्दनीं शरण । त्यासी सहजचि समाधान ॥ ५ ॥

एकनाथ या भारूडात भूत या रूपाने सांगतात. दादा वरले माळीं दिसतें , दोनी डोळे वटारितें , तें बा भेडसावितें , जवळीं गेल्या गिळूं पहातें. पुढे तें बा दुःखदायक , तेणें शिणविले सिद्ध साधक , तें बा विशाळ भयानक , वेगीं गोंवी तिन्ही लोक. शेवटी तनमनुधनें शरण , एकनिष्ठ जयाचें मन , एका जनार्दनीं शरण , त्यासी सहजचि समाधान.

- संत एकनाथ