भारूड

भवानी मी तुझा भुत्या खरा

एकनाथांचे भूत्या भारूड.

भवानी मी तुझा भुत्या खरा ॥ धृ॥
आनुहात चवडंक वाजत डुगडुग । होतो घोष बरा ॥१॥
बोधाची परडी ज्ञानाचा संबळ । आज्ञान तो पोत खरा ॥२॥
एका जनार्दनी भुत्या मी झालो । तुझे पायी मी खरा ॥३॥

एकनाथ या भारूडात भूत्या या रूपाने सांगतात. भवानी मी तुझा भुत्या खरा आनुहात चवडंक वाजत डुगडुग , होतो घोष बरा. पुढे बोधाची परडी ज्ञानाचा संबळ , आज्ञान तो पोत खरा. शेवटी एका जनार्दनी भुत्या मी झालो , तुझे पायी मी खरा.

- संत एकनाथ