भारूड

चौदेहांची घेऊनी दीक्षा

एकनाथांचे भारूड.

चौदेहांची घेऊनी दीक्षा ।
आम्ही मागू कोरान्न भिक्षा ।
अलक्ष्य अनुलक्ष ।
प्रत्यक्ष जनार्दन आम्हा साक्ष ॥१॥
बाबा बाळसंतोष ॥धृ. ॥
देही असून होऊ विदेही ।
कामक्रोध बांधू पायी ।
आशा मनिषा करु दिशा दाही ।
मदमत्सर उडवू भाई ॥२॥
प्रपंचाची लावूनी राख ।
तोडू जन्ममरणाचा पांग ।
एका जनार्दनी अनुराग ।
अक्षय संग संताचा ॥३॥
बाळ संतोष बाबा ॥

एकनाथ या भारूडात सांगतात. चौदेहांची घेऊनी दीक्षा , आम्ही मागू कोरान्न भिक्षा , अलक्ष्य अनुलक्ष , प्रत्यक्ष जनार्दन आम्हा साक्ष. पुढे बाबा बाळसंतोष देही असून होऊ विदेही , कामक्रोध बांधू पायी , आशा मनिषा करु दिशा दाही , मदमत्सर उडवू भाई. शेवटी बाळ संतोष बाबा.

- संत एकनाथ