भारूड

चोपदार आला चोपदार आला

एकनाथांचे चोपदार भारूड.

चोपदार आला चोपदार आला ॥धृ॥
माझे चोपदाराचे राहणे ।
आकाश स्वर्ग पाहणे ।
चतुर्मुख ब्रह्मा चकित होऊन ।
निराकारींची वस्ती दिधली विष्णूने ॥ १ ॥
शंख चक्र गदा घेऊन ।
महादेवी शून्य द्वारपाळ जाण ।
कळिकाळा टाकिन छेदून ।
रंडी चंडीशक्ती टाकीन भेदून ।
चोपदार आहे मी जाण ॥ २ ॥
आम्हांस नाही उपाय ।
आम्हांस नाही बाप ना माय ।
खरी चाकरी कोठे करावी ।
एका जनार्दनी दृढ धरावी ॥ ३ ॥

एकनाथ या भारूडात चोपदार या रूपाने सांगतात. चोपदार आला चोपदार आला माझे चोपदाराचे राहणे , आकाश स्वर्ग पाहणे , चतुर्मुख ब्रह्मा चकित होऊन , निराकारींची वस्ती दिधली विष्णूने. पुढे शंख चक्र गदा घेऊन , महादेवी शून्य द्वारपाळ जाण , कळिकाळा टाकिन छेदून , रंडी चंडीशक्ती टाकीन भेदून , चोपदार आहे मी जाण. शेवटी आम्हांस नाही उपाय , आम्हांस नाही बाप ना माय , खरी चाकरी कोठे करावी , एका जनार्दनी दृढ धरावी.

- संत एकनाथ