मोडकेसे घर तुटकेसे छप्पर ।
देवाला देवघर नाही ॥१॥
मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटकेच लुगडे तुटकिसी चोळी ।
शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर अंबाड्याची भाजी ।
वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार ।
नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने ।
राज्यात लेणे नाही ॥५॥
एका जनार्दनी समरस झाले ।
पण तो रस येथे नाही ॥६॥
एकनाथ या भारूडात दादला या रूपाने सांगतात. मोडकेसे घर तुटकेसे छप्पर , देवाला देवघर नाही. पुढे मला दादला नलगे बाई फाटकेच लुगडे तुटकिसी चोळी , शिवाया दोरा नाही. शेवटी एका जनार्दनी समरस झाले , पण तो रस येथे नाही.
- संत एकनाथ