भारूड

डोहो डोहो डोहो । कान्होबा डोहो । चला जाऊं डोहांत पोहों रे कान्होबा

एकनाथांचे डोहो भारूड.

डोहो डोहो डोहो । कान्होबा डोहो । चला जाऊं डोहांत पोहों रे कान्होबा ॥ध्रु०॥
त्या डोहाचें अमूप जीवन । डोहो पहातां अति गहन । तया नाहीं चळण वळण । सर्व जीवांचें निधान ॥ १ ॥
डोहो ज्याला हें जीवन । डोहो व्यालासे पवन । डोहो गिळिला पर्वत । डोहो कार्य करी कारण ॥ २ ॥
डोहो न कळे साचार । डोहो क्षर ना अक्षर । एका जनार्दनीं निर्धार । तरिच पावाल पैलपार ॥ ३ ॥

एकनाथ या भारूडात डोहो या रूपाने सांगतात. डोहो डोहो डोहो , कान्होबा डोहो , चला जाऊं डोहांत पोहों रे कान्होबा ० त्या डोहाचें अमूप जीवन , डोहो पहातां अति गहन , तया नाहीं चळण वळण , सर्व जीवांचें निधान. पुढे डोहो ज्याला हें जीवन , डोहो व्यालासे पवन , डोहो गिळिला पर्वत , डोहो कार्य करी कारण. शेवटी डोहो न कळे साचार , डोहो क्षर ना अक्षर , एका जनार्दनीं निर्धार , तरिच पावाल पैलपार.

- संत एकनाथ