भारूड

एडका मदन तो केवळ

एकनाथांचे एडका भारूड.

एडका मदन तो केवळ ॥ध्रु॥
धडक मारिली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा ।
इंद्र चंद्रासी दरारा । लाविला जेणे । तो केवळ पंचानन ॥ १ ॥
धडक मारिली नारदा । केला रावणाचा चेंदा ।
दुर्योधना मारिली गदा ।घेतला प्राण । तो केवळ पंचानन ॥ २ ॥
भस्मासुर मुकला प्राणांसी । तेचि गति झाली वालीसी ।
विश्वामित्रासारिखा ऋषि । नाडिलाजेणे । तो केवळ पंचानन ॥ ३ ॥
शुकदेवानी ध्यान धरोनी ।एडका आणिला आकळो नि ।
एका जनार्दनी चरणी । बांधिला जेणे ।तो केवळ पंचानन ॥ ४ ॥

एकनाथ या भारूडात एडका या रूपाने सांगतात. एडका मदन तो केवळ धडक मारिली शंकरा , केला ब्रह्मयाचा मातेरा , इंद्र चंद्रासी दरारा , लाविला जेणे , तो केवळ पंचानन. पुढे धडक मारिली नारदा , केला रावणाचा चेंदा , दुर्योधना मारिली गदा , घेतला प्राण , तो केवळ पंचानन. शेवटी शुकदेवानी ध्यान धरोनी , एडका आणिला आकळो नि , एका जनार्दनी चरणी , बांधिला जेणे , तो केवळ पंचानन.

- संत एकनाथ