फु फु फु फु फुगडी गे । दोघी घालूं झगडी गे । जाउनी महाद्वारी गे । तेथें घालीन फुगडी गे ॥ १ ॥
दोन्ही हस्तक धरून गे । तेथें घालीन फुगडी गे ॥ध्रु०॥
विटेवरील पाऊल येऊं गे । राहो माझे ह्रदयीं गे । जेथें वैष्णवांचा भार गे । तेथें घालीन फुगडी गे ॥ २ ॥
जेथें नामघोष गे । तेथें करीन झगडी गे । एका जनार्दनीं पाहून गे । मन माझें धालें गे ॥ ३ ॥
एकनाथ या भारूडात फुगडी या रूपाने सांगतात. फु फु फु फु फुगडी गे , दोघी घालूं झगडी गे , जाउनी महाद्वारी गे , तेथें घालीन फुगडी गे. पुढे दोन्ही हस्तक धरून गे , तेथें घालीन फुगडी गे ० विटेवरील पाऊल येऊं गे , राहो माझे ह्रदयीं गे , जेथें वैष्णवांचा भार गे , तेथें घालीन फुगडी गे. शेवटी जेथें नामघोष गे , तेथें करीन झगडी गे , एका जनार्दनीं पाहून गे , मन माझें धालें गे.
- संत एकनाथ