भारूड

ऎक ऎक सखये बाई । नवल मी सांगू काई

एकनाथांचे गौळण भारूड.

ऎक ऎक सखये बाई । नवल मी सांगू काई ।
त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेस म्हणतो आई ।
देवकीने वाहीला गे यशोदेने पाळिला ।
पांडवांचा बंधुजन होऊनीया राहिला ॥ १ ॥
ब्रह्माडांची साठवण योगीयांचे निजध्यान ।
चोरी केली म्हणोनिया उखळाशी बंधन ॥ २ ॥
सकळ तीर्थे ज्याचे चरणी । सुलभ हा सुलभ पाणी ।
राधिकेस म्हणतो तुझी करितो मी वेणी फणी ॥ ३ ॥
एका जनार्दनी कैवल्याचा मोक्षदानि
गायी गोप गोप बाळा मिळविली आपुलेपणी ॥ ४ ॥

एकनाथ या भारूडात गौळण या रूपाने सांगतात. ऎक ऎक सखये बाई , नवल मी सांगू काई , त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेस म्हणतो आई , देवकीने वाहीला गे यशोदेने पाळिला , पांडवांचा बंधुजन होऊनीया राहिला. पुढे ब्रह्माडांची साठवण योगीयांचे निजध्यान , चोरी केली म्हणोनिया उखळाशी बंधन. शेवटी एका जनार्दनी कैवल्याचा मोक्षदानि गायी गोप गोप बाळा मिळविली आपुलेपणी.

- संत एकनाथ