भारूड

वारीयाने कुंडल हाले । डोळे मोडीत राधा चाले

एकनाथांचे गौळण भारूड.

वारीयाने कुंडल हाले । डोळे मोडीत राधा चाले ।
राधेला पाहूनि भुलले हरी । बैल दोहितो आपुल्या घरी ॥ १ ॥
फणस गंभीर कर्दळी दाटा । हाती घेउनी सारंग पाट ॥ २ ॥
हरी पाहून भुलली चित्ता । मंदिरी घुसळी डेर रिता ॥ ३ ॥
मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना ॥ ४ ॥

एकनाथ या भारूडात गौळण या रूपाने सांगतात. वारीयाने कुंडल हाले , डोळे मोडीत राधा चाले , राधेला पाहूनि भुलले हरी , बैल दोहितो आपुल्या घरी. पुढे फणस गंभीर कर्दळी दाटा , हाती घेउनी सारंग पाट. शेवटी मन मिळालेसे मना , एका भुलला जनार्दना.

- संत एकनाथ