भारूड

असा कसा देवाचा देव बाई ठकडा देव एका पायानी लंगडा

एकनाथांचे गौळण भारूड.

असा कसा देवाचा देव बाई ठकडा देव एका पायानी लंगडा ॥ धृ. ॥
गवळ्याघरी जातो । दहीदूश चोरूनी खातो। करी दुधाचा रबडा ॥ १ ॥
शिंकेची तोडितो । मडकेचि फोडितो । पाडी नवनीताचा सडा ॥ २ ॥
वाळवंटी जातो । कीर्तन करतो । घेतो साधूसंतांशी झगडा ॥ ३ ॥
एका जनार्दनी । भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥ ४ ॥

एकनाथ या भारूडात गौळण या रूपाने सांगतात. असा कसा देवाचा देव बाई ठकडा देव एका पायानी लंगडा गवळ्याघरी जातो , दहीदूश चोरूनी खातो, करी दुधाचा रबडा. पुढे शिंकेची तोडितो , मडकेचि फोडितो , पाडी नवनीताचा सडा. शेवटी एका जनार्दनी , भिक्षा वाढा बाई , देव एकनाथाचा बछडा.

- संत एकनाथ