संत नाम गाय संत नाम गाय ।
संत नाम गाय कामधेनु ॥ १ ॥
सदा सर्वकाळ दुभे भक्तालागी ।
उणे पाहता अंगी धाव घाली ॥ २ ॥
नाम मुख स्तना लागला पान्हावे ।
अभक्त न पाहे धाव पाठी ॥ ३ ॥
जनी जनार्दन दुहिला आवडी ।
उभविली गुढी एकनाथे ॥ ४ ॥
एकनाथ या भारूडात गाय या रूपाने सांगतात. संत नाम गाय संत नाम गाय , संत नाम गाय कामधेनु. पुढे सदा सर्वकाळ दुभे भक्तालागी , उणे पाहता अंगी धाव घाली. शेवटी जनी जनार्दन दुहिला आवडी , उभविली गुढी एकनाथे.
- संत एकनाथ