भारूड

माझें कुळींची कुळस्वामिनी । विठाई जगत्रय जननी । येई वो पंढरपूरवासिनी । ठेविले दोनी कर जघनी

एकनाथांचे गोंधळ भारूड.

माझें कुळींची कुळस्वामिनी । विठाई जगत्रय जननी । येई वो पंढरपूरवासिनी । ठेविले दोनी कर जघनीं । उभी सखीसजनी ॥ १ ॥
येई पुंडलीक वरदायिनी । विश्वजननी । रंगा येई वो ॥ध्रु०॥
मध्यें सिंहासन घातलें । प्रमाण चौक हे साधिले । ज्ञान कळस वर ठेविले । पूर्ण भरियले । धूप दाविले । सुवासें करुनी ॥ २ ॥
सभामंडप शोभला । भक्ति चांदवा दिधला । उदो उदो शब्द गाजला । रंग माजला । वेद बोलिला । मूळचा ध्वनी ॥ ३ ॥
शुक सनकादिक गोंधळी । जीव शीव घेउनी संबळी । गाती हरीची नामावळी । मातले बळी । प्रेमकल्लोळीं । सुखाचे सदनीं ॥ ४ ॥
ऐसा गोंधळ घातीला । भला परमार्थ लुटिला । एका जनार्दनीं भला । ऐक्य साधिला । ठाव आपुला । लाभ त्रिभुवनीं ॥ ५ ॥

एकनाथ या भारूडात गोंधळ या रूपाने सांगतात. माझें कुळींची कुळस्वामिनी , विठाई जगत्रय जननी , येई वो पंढरपूरवासिनी , ठेविले दोनी कर जघनीं , उभी सखीसजनी. पुढे येई पुंडलीक वरदायिनी , विश्वजननी , रंगा येई वो ० मध्यें सिंहासन घातलें , प्रमाण चौक हे साधिले , ज्ञान कळस वर ठेविले , पूर्ण भरियले , धूप दाविले , सुवासें करुनी. शेवटी ऐसा गोंधळ घातीला , भला परमार्थ लुटिला , एका जनार्दनीं भला , ऐक्य साधिला , ठाव आपुला , लाभ त्रिभुवनीं.

- संत एकनाथ