मंडळ कमळ शुद्ध पराग हेंचि मुख ज्याचें वो । ओहं सोहं वाचे वदती अज्ञानपण त्याचें वो । परा आणि पश्यन्ती मध्यमा वैखरी सदा नाचे वो । तेचि विटेवरी अंबा उभी राहिली असे वो ॥ १ ॥
जयजय जगदंबे माउली वो ॥ध्रु०॥
गोजिरें रूप सुंदर उभी भीमातीरीं वो । चतुर्भुजा शोभिती शंख चक्र मिरवे करीं वो । कांसे पितांबर वैजयंती मिरवे ह्रदयावरी वो । पुंडलिकाकारणें तिष्ठे अठ्ठाविस युगें विटेवरी वो ॥ २ ॥
चरणरजालागीं वंदित ब्रह्मादिक जाहले पिसे वो । विश्वविश्वाकर जनीं जनार्दन भासे वो । अष्टभुजा नटली भक्तांकारणें विटेवरी वसे वो । एका जनार्दनीं आम्हां अनायासें दिसे वो ॥ ३ ॥
एकनाथ या भारूडात गोंधळ या रूपाने सांगतात. मंडळ कमळ शुद्ध पराग हेंचि मुख ज्याचें वो , ओहं सोहं वाचे वदती अज्ञानपण त्याचें वो , परा आणि पश्यन्ती मध्यमा वैखरी सदा नाचे वो , तेचि विटेवरी अंबा उभी राहिली असे वो. पुढे जयजय जगदंबे माउली वो ० गोजिरें रूप सुंदर उभी भीमातीरीं वो , चतुर्भुजा शोभिती शंख चक्र मिरवे करीं वो , कांसे पितांबर वैजयंती मिरवे ह्रदयावरी वो , पुंडलिकाकारणें तिष्ठे अठ्ठाविस युगें विटेवरी वो. शेवटी चरणरजालागीं वंदित ब्रह्मादिक जाहले पिसे वो , वि.
- संत एकनाथ