अनादि अंबिका भगवती । बोध परडी घेउनी हातीं । पोत ज्ञानाचा पाजळती । उदो उदो भक्त नाचती ॥ १ ॥
गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ अंबे ॥ध्रु०॥
व्यास वसिष्ठ शुक गोंधळी । नाचताती सोहंमेळीं । द्वैतभाव विसरूनी बळी । खेळती अंबे तुझे गोंधळी ॥ २ ॥
मुगुटमणी पुंडलीक । तेहतीस कोटी देव नायक । गोंधळ घालतील कौतुक । एका जनार्दनीं नाचे देख ॥ ३ ॥
एकनाथ या भारूडात गोंधळ या रूपाने सांगतात. अनादि अंबिका भगवती , बोध परडी घेउनी हातीं , पोत ज्ञानाचा पाजळती , उदो उदो भक्त नाचती. पुढे गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ अंबे ० व्यास वसिष्ठ शुक गोंधळी , नाचताती सोहंमेळीं , द्वैतभाव विसरूनी बळी , खेळती अंबे तुझे गोंधळी. शेवटी मुगुटमणी पुंडलीक , तेहतीस कोटी देव नायक , गोंधळ घालतील कौतुक , एका जनार्दनीं नाचे देख.
- संत एकनाथ