हळदुली वाटुनी वाटिला पाटा । अगुणाचा नोवरा हळदुली उटा ॥ १ ॥
नागवा नवरा नागवी नोवरी । दोघें बैसलें चराचरीं ॥ २ ॥
नागवा नवरा नवरी नेसला । नागव्या नवरीनें नवरा वेढिला ॥ ३ ॥
सभामंडपीं दोघे ते दोघे । एका जनार्दनीं नाचती भोगें ॥ ४ ॥
एकनाथ या भारूडात हळदुली या रूपाने सांगतात. हळदुली वाटुनी वाटिला पाटा , अगुणाचा नोवरा हळदुली उटा. पुढे नागवा नवरा नागवी नोवरी , दोघें बैसलें चराचरीं. शेवटी सभामंडपीं दोघे ते दोघे , एका जनार्दनीं नाचती भोगें.
- संत एकनाथ