भारूड

देहचतुष्ट्याची रचोनि होळी ।ज्ञानाग्नि घालुनि समूळ जाळी

एकनाथांचे होळी भारूड.

देहचतुष्ट्याची रचोनि होळी ।ज्ञानाग्नि घालुनि समूळ जाळी ॥ १ ॥
अझुनि का उगवलाची । बोंब पडू दे नामाची ॥ २ ॥
मांदी मेळवा संतांची । तुम्ही साची सोडवण्या ॥ ३ ॥
धावण्या धावती संत अन्तरंग ।संसार शिमगा सांग निरसती ॥ ४ ॥
एका जनार्दनी मारली बोंब । जन वन स्वयंभ एक झाले ॥ ५ ॥

एकनाथ या भारूडात होळी या रूपाने सांगतात. देहचतुष्ट्याची रचोनि होळी , ज्ञानाग्नि घालुनि समूळ जाळी. पुढे अझुनि का उगवलाची , बोंब पडू दे नामाची. शेवटी एका जनार्दनी मारली बोंब , जन वन स्वयंभ एक झाले.

- संत एकनाथ