मी जो जांगतों गांव निजला सारा । कोणी हुशार नाहींत घरा । अवघे निजले भ्रमले संसारा । कांहीं तरी पुढिलाची सोय धरा ॥ १ ॥
मी जागून जागवितों लोकां । निजेनें व्यापिलें काळ ग्रासील देखा । यांसी कोठवर मारूं तरी हांका । कैसे भुलले म्हणती माझे माझे देखा ॥ २ ॥
रात्र झाली दोन प्रहर सारी । आतां येईल बा चोराची फेरी । जिवाजीपंत तुम्ही जतन करा निर्धारी । नाहीं तरी हिरोनी नेतील गांठोडीं सारी ॥ ३ ॥
तुमचें हित वो तुम्ही करा । जागाल तरी चुकेल फेरा । सुखें निजतांना चोर नागवतील घरा । एका जनार्दनीं सद्गुरु पाय धरा ॥ ४ ॥
एकनाथ या भारूडात जागल्या या रूपाने सांगतात. मी जो जांगतों गांव निजला सारा , कोणी हुशार नाहींत घरा , अवघे निजले भ्रमले संसारा , कांहीं तरी पुढिलाची सोय धरा. पुढे मी जागून जागवितों लोकां , निजेनें व्यापिलें काळ ग्रासील देखा , यांसी कोठवर मारूं तरी हांका , कैसे भुलले म्हणती माझे माझे देखा. शेवटी तुमचें हित वो तुम्ही करा , जागाल तरी चुकेल फेरा , सुखें निजतांना चोर नागवतील घरा , एका जनार्दनीं सद्गुरु पाय धरा.
- संत एकनाथ