उठा उठा मायबाप । नका येऊं देऊं झोंप । आली वो आली यमाजीची तलब ॥ १ ॥
तुमचे गांवांत नाहीं पाटीलबावा । पाटलीण आवाचा मोठा दावा । घरचें घरकूल झाकून ठेवा ॥ २ ॥
तुमच्या सुनेची नाहीं वागणूक बरी । तिचे घरधनी मनाजी पाटील थोरी । त्यांच्यातील वाद सार्या गांवांत भारी ॥ ३ ॥
पाटीलबावाची ऐकावी थोरी । सहा कारभार करती घरीं । पांच तीं पोरें रडती दारोदारीं ॥ ४ ॥
आतां पाटीलबावा तुम्ही हुशारी धरा । यमाजीबाजी वो येतील घरा । इकडून तिकडे वो नाहीं पळाया ॥ ५ ॥
एका जनार्दनीं कांही हित करा । आपला आपण चुकवा फेरा । जन्ममरणाच्या तोडा येरझारा ॥ ६ ॥
एकनाथ या भारूडात जागल्या या रूपाने सांगतात. उठा उठा मायबाप , नका येऊं देऊं झोंप , आली वो आली यमाजीची तलब. पुढे तुमचे गांवांत नाहीं पाटीलबावा , पाटलीण आवाचा मोठा दावा , घरचें घरकूल झाकून ठेवा. शेवटी एका जनार्दनीं कांही हित करा , आपला आपण चुकवा फेरा , जन्ममरणाच्या तोडा येरझारा.
- संत एकनाथ