भारूड

हरिजागरणी दिवस आनंदे सौरसे

एकनाथांचे जागर भारूड.

हरिजागरणी दिवस आनंदे सौरसे ।
गावया उल्हास वैष्णवासी ॥ १ ॥
गाता पै नाचता तया जाला पै बोधु ।
त्यामाजी गोविंदु क्रीडतसे ॥ २ ॥
चला चला रे भाई हरिजागरा वेगी ।
वैष्णव हे रंगी नाचताती ॥ ३ ॥
स्वानंदे लवलाह्या उभवोनी श्सात्विका बाह्या ।
आलिंगू कान्ह्या अष्टभावी ॥ ४ ॥
दुजेपणाविण खेव पडिलेंस्शे मिठी ।
सांगणे पुसणे गोष्टी हारपली ॥ ५ ॥
यापरि वैष्णव रंगी करिताती आल्हाद ।
उसळला आनंद साठवेना ॥ ६ ॥
एकाएकी हो मिनला जनार्दन ।
तेणे सुखे मना उमजु नाही ॥ ७ ॥

एकनाथ या भारूडात जागर या रूपाने सांगतात. हरिजागरणी दिवस आनंदे सौरसे , गावया उल्हास वैष्णवासी. पुढे गाता पै नाचता तया जाला पै बोधु , त्यामाजी गोविंदु क्रीडतसे. शेवटी एकाएकी हो मिनला जनार्दन , तेणे सुखे मना उमजु नाही.

- संत एकनाथ