भारूड

भाव तोचि भगवा चिरा

एकनाथांचे जंगम भारूड.

भाव तोचि भगवा चिरा ।
मुळीचा तंतू शिव दोरा ।
आत्मलिंग पूजू बरा ।
मी आलो तुझिया द्वारा बापांनो ॥१॥
गुरुधर्म कोरान्न भिक्षा ।
परात्पर आमची दीक्षा रे बापांनो ॥धृ. ॥
देहदंड काठी हाती ।
आशा जाळुनी लाविल्या विभूती ।
दया क्षमाआणि शांती ।
आम्ही जंगम ऎशा रिती रे बापांनो ॥२॥
हरिनामाच्या घालुनि माळा ।
गुरुदीक्षेचा सोहळा ।
साधुसंत जाणती कळा ।
एका जनार्दनी भॊळा रे बापांनो ॥३॥

एकनाथ या भारूडात जंगम या रूपाने सांगतात. भाव तोचि भगवा चिरा , मुळीचा तंतू शिव दोरा , आत्मलिंग पूजू बरा , मी आलो तुझिया द्वारा बापांनो. पुढे गुरुधर्म कोरान्न भिक्षा , परात्पर आमची दीक्षा रे बापांनो देहदंड काठी हाती , आशा जाळुनी लाविल्या विभूती , दया क्षमाआणि शांती , आम्ही जंगम ऎशा रिती रे बापांनो. शेवटी हरिनामाच्या घालुनि माळा , गुरुदीक्षेचा सोहळा , साधुसंत जाणती कळा , एका जनार्दनी भॊळा रे बापांनो.

- संत एकनाथ