मी निर्गुणपुरीचा महार । करितों जोहार ॥ १ ॥
पाटीलबाबा तुमचे वस्तींत । पाटलिणीनें केलें बदमस्त ॥ २ ॥
तुमची रयत फिरली सारी । गांवचे बदलले कारभारी ॥ ३ ॥
आतां तुमचे नाहीं बरें । चौर्यांयशी लक्ष फिराल फेरे ॥ ४ ॥
एका जनार्दनीं महार । पायापाशीं केला जोहार ॥ ५ ॥
एकनाथ या भारूडात जोहार या रूपाने सांगतात. मी निर्गुणपुरीचा महार , करितों जोहार. पुढे पाटीलबाबा तुमचे वस्तींत , पाटलिणीनें केलें बदमस्त. शेवटी एका जनार्दनीं महार , पायापाशीं केला जोहार.
- संत एकनाथ