भारूड

कां रे महारा बदमस्ता । कां हो ब्राह्मणबावा भलतेंच बोलतां । तुझे बापाचें भय काय । मायबाप तु

एकनाथांचे जोहार भारूड.

कां रे महारा बदमस्ता । कां हो ब्राह्मणबावा भलतेंच बोलतां । तुझे बापाचें भय काय । मायबाप तुमचें आमचें एकच हाय । ऐक ऐसें बोलूं नको ।
निर्गुणापासून अवघें झालों । निर्गुण तुला काय ठावें । आत्मस्वरुपीं शोधून पहावें । आत्मस्वरूप आम्हां कळेना । नाहीं तरी संतांशीं शरण जा ना । संतांशीं गेल्यानें काय होतें । चौर्यांयशीचा फेरा चुकतो । हें ज्ञान तुला कोणापासून प्राप्त झालें । एका जनार्दन प्रसादें कळूं आलें ॥ १ ॥

एकनाथ या भारूडात जोहार या रूपाने सांगतात. कां रे महारा बदमस्ता , कां हो ब्राह्मणबावा भलतेंच बोलतां , तुझे बापाचें भय काय , मायबाप तुमचें आमचें एकच हाय , ऐक ऐसें बोलूं नको , निर्गुणापासून अवघें झालों , निर्गुण तुला काय ठावें , आत्मस्वरुपीं शोधून पहावें , आत्मस्वरूप आम्हां कळेना , नाहीं तरी संतांशीं शरण जा ना , संतांशीं गेल्यानें काय होतें , चौर्यांयशीचा फेरा चुकतो , हें ज्ञान तुला कोणापासून प्राप्त झालें , एका जनार्दन प्रसादें कळूं आलें.

- संत एकनाथ