भारूड

जोहार मायबाप धनी । मनाजीबावा कुळकर्णी

एकनाथांचे जोहार भारूड.

जोहार मायबाप धनी । मनाजीबावा कुळकर्णी ।
गांवचे पाटील जिवाजी नेमुनी । माझे धन्यांनीं ठेविले की जी मायबाप ॥ १ ॥
जोहार मायबाप जोहार । जोहार मायबाप जोहार ॥ ध्रु० ॥
गांवचे देसाई ठाणेदार । सबनीस आणि शेखदार ।
करती रयतेचा कारभार । परि धन्याचा विचार न करती की० ॥ २ ॥
खरीप रब्बी पिकाचे दाणे । सारा सारून भरा केणें ।
रुजू घेतील यमाजी संपूर्ण । बाकी निघतां नेती बांधून की० ॥ ३ ॥
नेउनी घालतील खोडा बेडी । बाकीची न चुकेची दमडी ।
मग काय तुमची गोडी । एका जनार्दनी करा जोडी की जी मायबाप ॥ ४ ॥

एकनाथ या भारूडात जोहार या रूपाने सांगतात. जोहार मायबाप धनी , मनाजीबावा कुळकर्णी , गांवचे पाटील जिवाजी नेमुनी , माझे धन्यांनीं ठेविले की जी मायबाप. पुढे जोहार मायबाप जोहार , जोहार मायबाप जोहार ० गांवचे देसाई ठाणेदार , सबनीस आणि शेखदार , करती रयतेचा कारभार , परि धन्याचा विचार न करती की०. शेवटी नेउनी घालतील खोडा बेडी , बाकीची न चुकेची दमडी , मग काय तुमची गोडी , एका जनार्दनी करा जोडी की जी मायबाप.

- संत एकनाथ