जोहार मायबाप जोहार । सर्व शरीराचा कारभार । मी आहे नफर साचार । मी वेसकर आलों ॥ १ ॥
मी निजानंदीचा रहिवाशी । धांवत आलों संतांपाशीं । सांगतां तें मानसीं । दृढ धरा ॥ २ ॥
माझे धनी मोठे थोर । त्यांचा मी आवडता फार । तेथील सारा कारभार । मीच करितों ॥ ३ ॥
माया ही धन्याची राणी । इची संगत नका धरूं कोणी । थोर थोर पडले व्यसनीं ॥ ४ ॥
विश्वामित्र पाराशर । नारदादी ऋषीश्वर । ब्रह्मा विष्णु शिव साचार ॥ ५ ॥
इंद्र चंद्र महामती । पाडिले विषयावरतीं । एका जनार्दनीं धरा भक्ती । मी वेसकर आलों ॥ ६ ॥
एकनाथ या भारूडात जोहार या रूपाने सांगतात. जोहार मायबाप जोहार , सर्व शरीराचा कारभार , मी आहे नफर साचार , मी वेसकर आलों. पुढे मी निजानंदीचा रहिवाशी , धांवत आलों संतांपाशीं , सांगतां तें मानसीं , दृढ धरा. शेवटी इंद्र चंद्र महामती , पाडिले विषयावरतीं , एका जनार्दनीं धरा भक्ती , मी वेसकर आलों.
- संत एकनाथ