भारूड

देहपूरचें दिले ठाणें । जिवाजीस बोलावणें । मग पळूं लागले रानोरानें । कोण सोडवी त्याकारणें ।

एकनाथांचे जोहार भारूड.

देहपूरचें दिले ठाणें । जिवाजीस बोलावणें । मग पळूं लागले रानोरानें । कोण सोडवी त्याकारणें । की जी मायबाप जोहार ॥ १ ॥
येईल यमाजीची पाळी । कोण तेथें कोणा सांभाळी । जिवाजी पळतील गांवचे बळी । होईल फजिती सारी की० ॥ २ ॥
अवघे राहतील घरचे घरीं । तुम्ही पडाल चौर्यांयशीच्या फेरी । किती जन्म वेरझारी । करा विचार याचा की० ॥ ३ ॥
शरण एका जनार्दनीं । मायबाप संत धनी । तेचि चुकवितील यातनी । धरा विश्वास की जी मायबाप जोहार ॥ ४ ॥

एकनाथ या भारूडात जोहार या रूपाने सांगतात. देहपूरचें दिले ठाणें , जिवाजीस बोलावणें , मग पळूं लागले रानोरानें , कोण सोडवी त्याकारणें , की जी मायबाप जोहार. पुढे येईल यमाजीची पाळी , कोण तेथें कोणा सांभाळी , जिवाजी पळतील गांवचे बळी , होईल फजिती सारी की०. शेवटी शरण एका जनार्दनीं , मायबाप संत धनी , तेचि चुकवितील यातनी , धरा विश्वास की जी मायबाप जोहार.

- संत एकनाथ