घ्या जोहार घ्या जोहार । मी निराकारीचा महार । संत सभेचा कारभार । मीच करितों की जी मायबाप ॥ १ ॥
मी धन्याचा आवडतां फार । धन्याचा विश्वास मजवर । धन्याचे चाकरीअर रुजू मी की० ॥ २ ॥
चार वेदां झाडितों । सहा शास्त्रांचा केर भरितों । पुराणें सर्व जमा करितों । संत सभेची सांपडेल वाट ।
तेणें मार्ग नीट सांपडेल की० ॥ ४ ॥
मार्ग धरा पंढरीचा । एका विनवी जनार्दनाचा । रामनाम बोला वाचा । सावध होऊन की जी मायबाप ॥ ५ ॥
एकनाथ या भारूडात जोहार या रूपाने सांगतात. घ्या जोहार घ्या जोहार , मी निराकारीचा महार , संत सभेचा कारभार , मीच करितों की जी मायबाप. पुढे मी धन्याचा आवडतां फार , धन्याचा विश्वास मजवर , धन्याचे चाकरीअर रुजू मी की०. शेवटी मार्ग धरा पंढरीचा , एका विनवी जनार्दनाचा , रामनाम बोला वाचा , सावध होऊन की जी मायबाप.
- संत एकनाथ