भारूड

जोहार मायबाप जोहार । मी विठु पाटलाचा महार । हिशोब देतों ताबेदार । लंकेचा कारभार की जी मायब

एकनाथांचे जोहार भारूड.

जोहार मायबाप जोहार । मी विठु पाटलाचा महार । हिशोब देतों ताबेदार । लंकेचा कारभार की जी मायबाप ॥ १ ॥
आवाजीकडून येतों । अर्धी भाकर मागून खातों । सारी रात्र गोवरापाशीं जागतों । फरमासी करतों की जी मायबाप ॥ २ ॥
पाटलाचा नांगर शेट्याची तागडी । आईबाईची बांगडी । आंत माझी पांचांची घडामोडी । करितों की जी मायबाप ॥ ३ ॥
येथें कुळकर्णी स्वाधीना करा । गांवचा हिशोब पाहिजे बरा । धन्याची रजा तलबेप्रमाणें मुशारा । ये चित्तांत की जी मायबाप ॥ ४ ॥
ब्रह्मानंदीं केला जोहार । एका जनार्दन बाजीचे उत्तर । माप केलें खरोखर । काय बोलिजे की जी मायबाप ॥ ५ ॥

एकनाथ या भारूडात जोहार या रूपाने सांगतात. जोहार मायबाप जोहार , मी विठु पाटलाचा महार , हिशोब देतों ताबेदार , लंकेचा कारभार की जी मायबाप. पुढे आवाजीकडून येतों , अर्धी भाकर मागून खातों , सारी रात्र गोवरापाशीं जागतों , फरमासी करतों की जी मायबाप. शेवटी ब्रह्मानंदीं केला जोहार , एका जनार्दन बाजीचे उत्तर , माप केलें खरोखर , काय बोलिजे की जी मायबाप.

- संत एकनाथ