भारूड

येथुनि पुढे बरें होईल । भक्‍तिसुखे दोंद वाढेल

एकनाथांचे जोशी भारूड.

येथुनि पुढे बरें होईल । भक्तिसुखे दोंद वाढेल ।
फेरा चौर्यांशीचा चुकेल । धन मोकाशी ॥ १ ॥
मी आलो रायाचा जोशी । होर ऎका दादांनो ॥ध्रु॥
मनाजी पाटील देहगावचा । विश्वास धरु नका त्याचा ।
हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारिण । झगडा घाली मोठी दारुण ।
तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३।
एका जनार्दन कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी ।
जा शरण सद्गुरुंसी । फेर चुकवा चौर्याऎंशी ॥४॥

एकनाथ या भारूडात जोशी या रूपाने सांगतात. येथुनि पुढे बरें होईल , भक्तिसुखे दोंद वाढेल , फेरा चौर्यांशीचा चुकेल , धन मोकाशी. पुढे मी आलो रायाचा जोशी , होर ऎका दादांनो मनाजी पाटील देहगावचा , विश्वास धरु नका त्याचा , हा घात करील नेमाचा , पाडील फशी. शेवटी वासना बायको शेजारिण , झगडा घाली मोठी दारुण , तिच्या पायी नागवण , घर बुडविसी ३, एका जनार्दन कंगाल जोशी , होरा सांगतो लोकांसी , जा शरण सद्गुरुंसी , फेर चुकवा चौर्याऎंशी.

- संत एकनाथ