भारूड

आम्ही अलक्षपुरीचे जोशी । शकुन सांगू निश्चयेसी

एकनाथांचे जोशी भारूड.

आम्ही अलक्षपुरीचे जोशी । शकुन सांगू निश्चयेसी ।
तेणे चुकतीचौर्याऎंशी । मी निर्गुणपुरींचा जोशी ॥१॥
होरा ऎका दादांनो ॥ध्रु॥
नका जाऊ मना मागे । थोर थोरा जाहले दगे ।
मी बोलत नाही वाउगे । सावध रहा दादांनो ॥२॥
वासना वाईट ही बा थोर । पुरविले लहान थोर ।
फिरतीचौर्याऎंशी लक्ष घर । पडाल फशी दादांनो ॥३॥
एका जनार्दनी जोशी । सांगेन शकुन सर्वत्रांसी ।
रामनाम वाचेसी । तेणे तरती विश्वासी दादांनो ॥४॥

एकनाथ या भारूडात जोशी या रूपाने सांगतात. आम्ही अलक्षपुरीचे जोशी , शकुन सांगू निश्चयेसी , तेणे चुकतीचौर्याऎंशी , मी निर्गुणपुरींचा जोशी. पुढे होरा ऎका दादांनो नका जाऊ मना मागे , थोर थोरा जाहले दगे , मी बोलत नाही वाउगे , सावध रहा दादांनो. शेवटी एका जनार्दनी जोशी , सांगेन शकुन सर्वत्रांसी , रामनाम वाचेसी , तेणे तरती विश्वासी दादांनो.

- संत एकनाथ