ॐकार निजवृक्ष त्यावरी वेधलो प्रत्यक्ष ।
दान मागी रामकृष्ण जनार्दना प्रत्यक्ष ॥१॥
झालो मी अंधपंगु । माझा कोणि न धरती संगु ॥धृ. ॥
चालता वाट मार्गा मज काही दिसेना ।
उच्चारिती नाम संतमार्गे चाललो जाणा ॥२॥
पाहुनी पंढरी पेठ अंधपणा फिटलो ।
एका जनार्दनी संतपायी लीन झालो ॥३॥
एकनाथ या भारूडात सांगतात. ॐकार निजवृक्ष त्यावरी वेधलो प्रत्यक्ष , दान मागी रामकृष्ण जनार्दना प्रत्यक्ष. पुढे झालो मी अंधपंगु , माझा कोणि न धरती संगु चालता वाट मार्गा मज काही दिसेना , उच्चारिती नाम संतमार्गे चाललो जाणा. शेवटी पाहुनी पंढरी पेठ अंधपणा फिटलो , एका जनार्दनी संतपायी लीन झालो.
- संत एकनाथ