भारूड

कृष्णा नवल कैसी परी । तूं आत्मा एक चराचरीं । तेथें द्वेषेंसी कवणा हरी । कैसे मारिले दैत्य

एकनाथांचे कोडें भारूड.

कृष्णा नवल कैसी परी । तूं आत्मा एक चराचरीं । तेथें द्वेषेंसी कवणा हरी । कैसे मारिले दैत्य त्वां वैरी ॥१ ॥
कान्होबा सांग पां माझें कोडें । तुझें पुसतों तुझिया पुढें ॥ध्रु०॥
देहीं नख शिख अवघें एक । देहा रुतती नखें तीख । त्याच्या छेदनीं आम्हां सुख । तैसे मारिले अधर्मी देख ॥ २ ॥
तुज भेद नाहीं नरनारी । कैसे सोळा सहस्त्र तुझिया घरीं । तूं म्हणविसी बाळब्रह्मचारी । शेखीं जालासी कां परद्वारीं ॥ ३ ॥
हेम मृत्तिकेच्या घट श्रेणी । आंत भरलें निर्मळ पाणी । त्यांत बिंबोनि अलिप्त तरणी । तैशा भोगुनी बहु कामिनी ॥ ४ ॥
जग अवघें तुझिया कुशीं । रसना अंकित नव्हे म्हणविसी । रसस्वाद जाणें ज्ञानरासी ॥ ६ ॥
एका जनार्दनीं घेतिला थाया । तो संकल्पाची न ये आया । तेथें हारपली माझी माया । देहीं देहपण गेलें विलया ॥ ७ ॥

एकनाथ या भारूडात कोडें या रूपाने सांगतात. कृष्णा नवल कैसी परी , तूं आत्मा एक चराचरीं , तेथें द्वेषेंसी कवणा हरी , कैसे मारिले दैत्य त्वां वैरी. पुढे कान्होबा सांग पां माझें कोडें , तुझें पुसतों तुझिया पुढें ० देहीं नख शिख अवघें एक , देहा रुतती नखें तीख , त्याच्या छेदनीं आम्हां सुख , तैसे मारिले अधर्मी देख. शेवटी एका जनार्दनीं घेतिला थाया , तो संकल्पाची न ये आया , तेथें हारपली माझी माया , देहीं देहपण गेलें विलया.

- संत एकनाथ